TY - BOOK AU - देशपांडे, सुनिता TI - आहे मनोहर तरी - Ahe Manohar Tari SN - 9789350911358 U1 - CH-12 PY - 2021/// CY - मुंबई PB - मौज प्रकाशन KW - चरित्र N2 - सुनीताबाई देशपांडे यांचं स्वतःविषयीचं हे प्रांजळ कथन. 'पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी' एवढीच ओळख असणाऱ्या सुनीताबाई तितक्याच समर्थ लेखिका असल्याचे या पुस्तकामुळे प्रकाशात आले. पुस्तकाच्या प्रारंभीच त्या म्हणतात, 'आठवणींच्या प्रदेशातील ही स्वैर भटकंती. पाखरांसारखी. क्षणात या फांदीवर, कुठूनही कुठेही दिशाहीन. पण स्वतःच्याच जीवनसुत्राशी अदृश संबंध ठेवत केलेली.' याच जीवनसूत्राला धरून ठेवलेली त्यांच्या आठवणींची वीण वाचकाला खिळवून ठेवते. या भटकंतीत आलेले अनुभव, भेटलेली माणसे आणि विचारांच्या जगातील हा स्वच्छंद जीवनानुभव आहे. त्या म्हणतात, 'सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच.' ER -