TY - BOOK AU - सखाराम, शंकर TI - बलुतेदार - Balutedar U1 - KT-3 PY - 2007/// CY - मुंबई PB - मॅजेस्टिक प्रकाशन KW - कथा N2 - गतकालीन ग्रामव्यवस्थेत बलुतेदार, बलुतेदारीस महत्त्वाचे स्थान होते. स्वयंपूर्ण गावाचा गावगाडा चालण्यास बलुतेदारीच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेला वेगळे महत्त्व होते देशी कारागिरी तेव्हा सन्मानाने पोसली होती. कुणबी आणि बलुतेदार गांचे संबंध गाय-वासरासारखे दृढ होते. यातून ग्रामीण भारत्त स्वयंपूर्ण होता. आज ही ग्रामव्यवस्था कोलमडली आहे. औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, एसईझेडचे क्रूर आक्रमण यातून उध्वस्त झाली आहे. तरी हीविषयी रोजच्या बोलण्यात, लिहिण्या- वाचण्यात, अभ्यासक्रमात, एकूण समाजव्यवहारात नेहमी उल्लेख येतात. अशा वेळी नवी पिढी संभांत होत आहे. त्यासाठी हे 'बलुतेदार' त्यांची स्वायत्त ग्रामसंस्कृती घेऊन वाचकांच्या भेटीस आले आहेत. मातीतून यदृ‌च्छया उगवलेली, कुलोत्पन अशी ही सजीव शब्दचित्रे आहेत. ही वाचता वाचता बलुतेदारीकालीन पट उलगडत जातो. पुस्तकातील उपो‌द्घात आणि परिशिष्टातील व्युत्पत्तिदर्शक शब्दकोश हा विस्तृत पट उलगडण्यास मदत करतात, समाजशास्त्रीय, अर्थशास्त्रीय बोली-भाषाशास्त्रीय दृष्ट्या यास आश्वासित स्थानं आहे ER -