TY - BOOK AU - खांडेकर, वि. स. AU - अनु. लवटे, सुनीलकुमार TI - वैनतेय - Vaintey SN - 9789353173463 U1 - MHT-133 PY - 2019/// CY - पुणे PB - मेहता पब्लिशिंग हाऊस KW - माहितीपर N2 - 'वैनतेय' नावाचं साप्ताहिक कोकणासारख्या दुर्गम भागात सन १९२४ पासून चालवलं जातं. वि. स. खांडेकर या साप्ताहिकाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होत. सदर साप्ताहिकात त्यांनी सन १९२४ ते १९३७ असं तपभर विपुल लेखन केलं. त्यातील 'अग्रलेख', 'परिचयाची परडी' अशा स्तंभ आणि सदरात केलेल्या लेखनाचा संग्रह म्हणजे हा 'वैनतेय' ग्रंथ होय. साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले वि. स. खांडेकर 'वैनतेय' शिवाय 'ज्योत्स्ना', 'हंस' (हिंदी) चे वाङ्मयीन संपादक होते, हे फार कमी लोकांना माहीत असावं. या 'वैनतेय' मधील अग्रलेख, समीक्षा, लघुनिबंध, टिपणे वाचली की लक्षात येतं खांडेकर हे चतुरस्र लेखक होते खरे! खांडेकरांचे अग्रलेख शिक्षण, राष्ट्रीयता, अस्पृश्यता निवारण, न्याय, धर्म, संस्कृती, इतिहास, राजकारण, सहकार, अर्थशास्त्र, संप, संघटना, साहित्य, भाषा, व्यक्ती असा बहुपदरी गोफ असायचा. यातून खांडेकरांचा लेखन, वाचनाचा पट किती बहुआयामी होता, हे स्पष्ट होतं ER -