संचितांची कोजागिरी - Sanchitanchi kojagiri
Material type:
- KD-73
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KD-73 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000362 |
'संचिताची कोजागिरी' ही कादंबरी-त्रिवेणी आहे. आयुष्यात सारे मिळण्यामागे धावता धावता अचानक स्वात्मचिंतनाची झळ बसते. अपूर्णतेची बाधा होते. खडतर प्रवासाच्या चिंतनगर्भ वाटा सोबत करतात. आत्म औदुंबराचा तळ गवसतो. 'फांदीतले गाणे' प्रकटते.
घर, वस्तू, मुले यांचे प्रदर्शन म्हणजे संसार नव्हे. संसार म्हणजे द्वैताच्या सावलीत अद्वैताचा खेळ खेळणे. अस्तित्वाचा अवकाश सांभाळणे. आपण आपल्यालाच पुन्हा पुन्हा नवनव्या जन्मांनी रचणे. भावोत्कट आवर्तने मोजीत नव्या आत्मभानाला सामोरे जाणे. या साऱ्यांचा नाद घेतलेला 'झांजेतला चंद्र' जे काही आपल्याला सांगतो, त्यापेक्षा त्याच्या सूचकतेतले संकेत अनुभवायची हिंमत या कादंबरीतून मिळते.
'अश्वत्थाची वसती' ही कादंबरी म्हणजे दोन पिढ्यांमधले चिरंजीव द्वंद आहे. जगण्यातला कस अनाठायी संपतो. विश्व आणि मानव यांच्या संबंधित्वात नात्यांपलीकडली आव्हाने निर्माण होतात. तरीही अहंकारातून पुन्हा पुन्हा नवतेकडे जाताना मूळ शोधायची माणसाची जिद्द बाकी राहते. तेव्हा या कादंबरीचे मर्म समजते.
अशी ही 'कादंबरी-त्रिवेणी' म्हणजे 'संचिताची कोजागिरी'! ती आपल्या मनात नवे प्रश्न निर्माण करते. नव्या काळाला नवे पान देते. या साऱ्यातून सूज्ञ भान येते. आपला आपल्याशी संवाद सुरू होतो. तो अश्वत्थाच्या वसतीतून फांदीतल्या गाण्यापर्यंत सहज जातो. लख्ख अनुभवाची कोजागिरी येते नि ती आपल्या संचिताची आत्मगाथा बनते.
There are no comments on this title.