सोन्याच्या धुराचे ठसके पाव शतकी सौदी अनुभव - Sonyachya Dhurache Thaske Pav Shataki Saudi Anubhav
Material type:
- KT-141
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Date due | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KT-141 (Browse shelf(Opens below)) | Checked out | Library | 15/10/2025 | DBPL-000332 |
अनुभव कथन, माहितीपर
सौदी अरेबियासारख्या अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या, कट्टर इस्लामी राज्यात उपेक्षा, अन्याय नि हालअपेष्टा सहन करत, आयुष्यातील उमेदीची पंचवीस वर्षे वास्तव्य करणाऱ्या डॉ. उज्ज्वला दळवी यांनी त्या देशाच्या अंतरंगात शिरून, ते उकलून आपल्यापुढे ठेवले आहे. आपण वाचकांनी त्याबद्दल त्यांचं कृतज्ञ असायला हवं.
सौदी अरेबिया या अतिश्रीमंत देशाच्या अती मागास भागातल्या, अशिक्षित, भटक्या मेंढपाळांच्या गावाला पोचलेल्या डॉक्टर दांपत्याचा हा अनुभव आहे. तिथे त्यांना, टोळ-घोरपडी पकडून चवीने खाणारा, पण भाज्या-कोशिंबिरी कचरा म्हणून फेकणारा ओबाइदल्ला; अकराव्या बाळंतपणानंतर वर्षभर दिवस गेले नाहीत म्हणून रडकुंडीला येणारी नूरा; 'मला सवत करून घे ना!' असं डॉक्टरणीलाच साकडं घालणारी लडिवाळ मुशाया; फौजेतला भाऊ सुटीवर आला की हॉस्पिटलच्या आसऱ्याला येणारी असहाय्य तुफला अशा आणि इतरही अनेक विलक्षण वल्ली भेटल्या. त्या वाळवंटी पाणवठ्यापासून जुबैलच्या अत्याधुनिक प्रकाशनगरीपर्यंतची सामान्य सौदी माणसाची वाटचाल आणि त्यामागची सौदी मानसिकता त्यांना डॉक्टर म्हणून जवळून बघता आली. खेळकरपणे सांगितलेल्या पावशतकी कडू-गोड आठवणींचा हा ठेवा रसिकांना सौदी अरेबियाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लावेल.
There are no comments on this title.