कबंध - Kabandha
Material type:
- 9788177665611
- KT-66
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KT-66 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000257 |
गूढकथा
गूढकथा म्हणजे काय ? तर आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळ्या गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले. परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का ? याचे अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
या सर्व गूढतेचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. परंतु विज्ञानाच्या दृष्टीने या विषयात कितीसे तथ्य असते हा विवाद्य विषय आहे. त्यामुळे वास्तववादी कथा म्हणजे कलात्मक कथा आणि गूढकथा या कलाशून्य असे ढोबळ समीकरण बेतले गेले आहे.
रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी हे समीकरण चुकीचे ठरवले आहे. उत्तम गूढकथांमध्ये चांगले व्यक्ति-चित्रण, मनाची पकड घेणार्या कथानकाबरोबरच उत्कृष्ट वातावरण-निर्मिती, या सार्यांची एक स्वतंत्र आकर्षक शैली रहस्य निर्माण करणार्याकडे असावी लागते. आणि ही सर्व वैशिष्ट्ये रत्नाकर मतकरी यांच्या लेखनात असल्याचे वाचकांनीच मान्य केलेले आहे.
अर्थात हे सगळे तात्त्विक चिंतन झाले.
पण ज्याचा कुठल्याही गूढप्रकारावर विश्वास नाही, अशा माणसालाही हे पुस्तक सबंध वाचावेसे वाटेल. एवढी खात्री नक्कीच आहे.
There are no comments on this title.