नांगरणी - Nangarani
Material type:
- 8177665170
- CH-7
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | CH-7 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000125 |
Browsing Dina Bama Patil Library & Study Room shelves, Collection: ISSUE-RETURN Close shelf browser (Hides shelf browser)
प्रत्येकाची आपली अशी एक वाट असते. काहींची सरळ, धोपट, काहीची वळणावळणांची अडीअडचणींची लेखकाचीही आपली एक वाट काट्याकुट्यांनी भरलेली. दगडधोंडे आडवे येणारी. तरीही पुढे जायला प्रवृत्त करणारी. पुढे जायचंच या कल्पनेने झपाटलेला जीव काटेरी मार्गाची वाट त्या झपाटलेपणामुळं सहज पार करतो. आणि इच्छा आकांक्षांची पूर्ती; हवं ते मिळवल्याचं मनभरून राहिलेल्या समाधानानं, तृप्तीनं मागं वळून बघतानाचा क्षण, आयुष्याच्या वळत्या वाटेवरचं उमलण्याच्या कल्पनेनं झपाटणं, फुलार, बहरणं, आठवणींचे दवबिंदू पानावरून ओघळले तरी पानांच्या अंगोपांगी असलेलं ओलेपण जपणार्या स्मृतीची सहज उलगड जाणारी मालिका म्हणजे नांगरणी
एस. एस. सी. पूर्वीचा काळ यादवांच्या 'झोंबी’मध्ये चित्रित झाला आहे. नांगरणी मध्ये त्या पुढील कॉलेज शिक्षणाचा काळ आला आहे. व्यक्तीत्वाचं रोपटं बहरावं म्हणून परिस्थितीच्या मातीची मशागत करताना, संकटाची तण उपटून फेकताना आलेले कडू गोड अनुभव, सहज सुलभ शैलीत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केलेला आहे. झोंबीपेक्षा नांगरणीतला लेखकाचा दृष्टीकोन अधिक व्यापक आहे. प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात उभा असलेला लेखक हा नांगरणीचा गाभा आहे. सहजसुलभतेने उलगडत जाणारी उत्कट आत्मकथा !
There are no comments on this title.