रगडा - Ragada
Material type:
- KT-8
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KT-8 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000008 |
आपले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून वास्तबधादी लेखन करताना खेड्यापाड्यातील समय जीवनाचा चित्रवशी आलेख मांडण्यात श्री. सदानंद वैशमुख याची लेखणी यशस्वी ठरली आहे. एरवी सामान्य वाटणान्या स्वी-पुरुषांना आपल्या लेखनाच्या केंद्रस्थानी आणून त्यांच्या भावविश्वात लीलया प्रवेश करून त्यांचे जगण्याचे छोटे-मोठे प्रश्न, हर्षामर्ष, स्वप्न आणि स्वप्नभंग, त्यांची अभावग्रस्तता, संघर्ष, घुसमट, वेदना आणि विद्रोह यांचा भेवक वेध घेऊन वाचकांनाही या जगण्याचा ते प्रत्ययकारी परिचय करून देतात. अस्वस्थ करतात. ते स्वतः बाच समाजघटकातून पुढे आलेले लेखक असून आजही त्यांचे वास्तव्य याच ग्रामीण भागात असल्यामुळे त्यांचे लेखन समकालीन ग्रामीण वास्तवाला शब्दस्वर वेताना दिसते.
मानवी जीवनाबद्दल असणारा अंतःस्थ कळवळा आणि मानवाच्या सुखकारी जीवनाचा ध्यासः यामुळे सदानंद देशमुख यांचे साहित्य नैतिक उचीवर जाते. काव्यात्म य संस्मरणीय अनुभूती देण्याची शक्ती ठेवते. त्यामुळेच विशिष्ट प्रदेशाच्या बोलीत लिहूनही संवादाची क्षमता असलेल्याः कुठेही पारंपरिक न होता मांडणीचा अंगभूत वेग घेऊन येणाऱ्या त्यांच्या 'रगडा' या संग्रहातील कथा आणि वीर्थकथा लक्षवेधी ठरल्या आहेत.
'साहित्य अकादेमी' आणि 'जयवंत दळवी स्मृती पुरस्कार यांसारख्या साहित्यातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेले श्री. सदानंद देशमुख यांचा 'रगा' हा कथासंग्रहही त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढविणारा आहे.
There are no comments on this title.