पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर - Purandarenchi Itihasadrohi Bakhar
Material type:
- 9789384091460
- HTR-89
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | HTR-89 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-002912 |
2520 2025-02-02
पुरंदरेंचा शिवचरित्र लेखन,
संकुचित उद्दिष्ट,
शिवचरित्राचे एकांगी लेखन,
विशिष्ट वर्गातील तरुण,
वर्गीय विरोध,
शिवाजी महाराज,
जातिधर्माच्या पलीकडे जाणारे महाराज,
स्वजातिवर्चस्व भावना,
बहुजन समाज,
बदनामीकारक व फसवे लेखन,
कृत्रिम व नकली भाषा,
वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न,
लेखनाचा अस्सल आशय अभाव
पुरंदरेंनी कितीही आव आणला, तरी ते शिवचरित्राकडे स्वच्छ दृष्टीने पाहू शकलेले नाहीत. त्यांनी शिवचरित्र हे आपल्या एका संकुचित उद्दिष्टाचे साधन मानून आपले पुस्तक लिहिले आहे, ही त्यांची सर्वांत मोठी मर्यादा आहे. एका विशिष्ट वर्गातील तरुणांना दुसऱ्या एका वर्गातील लोकांच्या विरोधात पेटून उठण्यास प्रवृत्त करावे, याच हेतूने त्यांनी महाराजांचे चरित्र लिहायला घेतल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत एकांगी झाले आहे.
चरित्रनायक शिवाजी महाराज हे जातिधर्माच्या पलीकडे जाऊन आपल्या अंतःकरणात सर्वांना सामावून घेणारे आणि त्यांचे चरित्र लिहिणारा लेखक मात्र निःसंदिग्धपणे स्वजातिवर्चस्वाच्या भावनेने पुरता पछाडलेला. असा मनुष्य त्या महामानवाच्या चरित्राला न्याय कसा देऊ शकेल बरे ?
पुरंदरे, तुम्ही बहुजन समाजाला खोल्या, बदनामीकारक, कृत्रिम, नकली, बनावट, फसव्या भाषेच्या भपक्याने दीर्घकाळपर्यंत खुलवले, झुलवले आणि भुलवले- पण अस्सल आशयाने फुलवले मात्र नाही ! मानले पाहिजे तुम्हांला : आपल्या जनसमूहाचे वर्चस्व टिकवण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या हो तुम्ही !
There are no comments on this title.