सर्वांसाठी शिक्षण: दिसायला सोपे पण असायला कठीण - Sarvansathi Shikshan Disayala Sope Pan Asayala Kathin
Material type:
- R-3
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | R-3 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-001810 |
Browsing Dina Bama Patil Library & Study Room shelves, Collection: ISSUE-RETURN Close shelf browser (Hides shelf browser)
वीटभट्टी, बांधकाम, उसतोडणी, नंदीबैल, उंटवाले, कडकलक्ष्मी संबंधित कामगारांची मुले त्याच्या राहाण्याच्या जागेत होणाऱ्या बदलामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. त्याचप्रमाणे उच्चभ्रू सोसायटीत काम करणाऱ्यांची व भीक मागणारी मुले देखील शाळेपासून लांबच राहतात. याची जाणीव 'कॉलेज ऑफ सोशलवर्क' येथे शिकणाऱ्या (निर्मला निकेतन) प्रा. रजनी परांजपे यांना झाली. म्हणून त्यांनी 'डोअर स्कूल' ची स्थापना केली. वेगवेगळ्या वस्त्यांमधील मुलांना शिकवायला त्यांनी सुरुवात केली. मुलांचे व पालकांचे विविध प्रश्न व अडचणी समजून घेतल्या व त्यावर तोडगे काढलेत. त्यांच्या पालकांचा विरोध नव्हताच परंतु आपल्या सारख्या सुशिक्षितांना हा प्रश्न का पडत नाही हे एक कोडच आहे. यशापयशाची पर्वा न करता गेली ३० वर्षे हा शिक्षणाचा यज्ञ त्यांनी चालू ठेवला आहे. शासनाच्या 'सर्वांसाठी शिक्षण' या घोषणेला सर्वत्र योग्य तो प्रतिसाद मिळाला किंवा नाही, परंतु परांजपे मॅडमची या उपेक्षित मुलांच्या शिक्षण देण्यामधील कळवळा मात्र दिसून येतो. त्यांचे प्रयत्न या उपेक्षित मुलांना एक नवीन जग दाखविण्याचा, नवीन स्वप्न त्यांच्या डोळ्यात फुलविण्याचा आहे. त्यांच्या पिचलेल्या मनात काहीतरी करुन दाखविण्याचे स्फुल्लींग, आत्मसन्मान निर्माण करण्याची दुर्दम्य इच्छा आहे. आणि ही मुले हा वसा पुढच्या पिढीपर्यंत नेतील असा विश्वास आहे. त्यांच्या या अथक प्रयत्नांना म्हणूनच सलाम.
There are no comments on this title.