शिवगंध - Shivgandh
Material type:
- 9789386469915
- HTR-59
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | HTR-59 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-001186 |
"मी फार काही न बोलता माझ्या मेकअप रूमकडे गेलो. जिरेटोप काढला. त्याला कपाळी लावला, समोरच्या मेजावर ठेवला, गळ्यातली कवड्यांची माळ काढली. तिला प्रणिपात केला आणि माझ्या नकळत डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. पंधराएक मिनिटं मी ढसाढसा रडत होतो. माझ्या मेकअप रूममधून रायगडाच्या प्रवेशद्वारावरचा भगवा ध्वज फडकताना दिसत होता. मावळत्या सूर्याची किरणं त्यावर पडत असल्यानं निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो खुलून दिसत होता. डोळ्यांतून ओघळणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे काहीसं धूसर दिसत होतं. मला जाणवलं, माझ्यातून काही तरी निघतं आहे आणि ते त्या भगव्यामध्ये मिसळून जातं आहे. मी रिता होत होतो आणि मन समाधानानं भरून जात होतं."
'राजा शिवछत्रपती' ह्या मालिकेनं मराठी मालिकांच्या इतिहासात स्वतःचं गौरवपूर्ण स्थान निमार्ण केलं आहे. या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली ती डॉ. अमोल रामसिंग कोल्हे या तरुण कलाकारानं. ही भूमिका करत असताना डॉ. अमोल कोल्हे यांनी कशी कठोर मेहनत घेतली, काय काय केलं याचा लेखाजोखा मांडणारं 'शिवगंध' हे एक स्मरणरंजन आहे. एखाद्या मालिकेवर, त्या मालिकेतील भूमिकेवर आधारलेलं हे मराठीतील पहिलं पुस्तक आहे.
There are no comments on this title.