दरवाजे - Darwaje
Material type:
- 9788177868357
- KT-283
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KT-283 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-001066 |
एकोणिसाव्या शतकातील साठच्या दशकातील किंवा त्यानंतरच्या दोन शतकातील वाचकांसाठी नारायण धारप हे नाव गूढरम्य, अलौकिक शक्तींचे दर्शन आपल्या साहित्यातून घडवणारा एक लोकप्रिय लेखक म्हणून आजही आठवत असेल.
त्यांच्या दरवाजे या पुस्तकात वाचकांना भावनेच्या तीन कथा आहेत. ताईत, मध्यस्थ आणि दरवाजे.
होणारं चुकत नाही ते चुकवण्याचा प्रयत्न केला तर त्याहूनही भयंकर काहीतरी नशिबी येते. निसर्गाच्या आणि नियतीच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा भयंकर परिणाम 'ताईत' कथेतील दंपतीला भोगावे लागतात आणि नशिबात नसलेल्या हव्यास धरण्यापाई हातचा एकुलता एक मुलगाही गमवावा लागतो. तर एक निरागस मुलीच्या मृत आत्म्याची जिवंतपणी अतृप्त राहिलेली आईच्या प्रेमाची तहान पूर्ण करत असतानाचा तिच्या आईच्या मनातील अपराध भावनेची नीरगाठ सोडवण्यात 'मध्यस्थ' ठरणाऱ्या मिलिंदची कथा श्वास रोखायला लावते.
हीच आपली वेळ, मिलिंदच्या मनात एक अनाहूत विचार आला. तो पुढे झाला. काय करायचं ते त्याला पूर्णपणे समजलं होतं. ज्या क्षणी शकुंतला खाटेवर बाकली त्याच क्षणी त्याने उमाबाईंच्या मिठीतून तो लहान मृतदेह चटदिशी काढून घेतला, त्या मोकळ्या जागेत शकुंतला एक प्रकारच्या भयानक शीघ्रतेने शिरली. उमाबाईना त्या अदलाबदलाची कल्पना तरी होती का नाही मिलिंदला समजलं नाही. खोलीबाहेर जायच्या आधी एक क्षण त्याने त्या मायलेकीकडे पाहिलं, उमाबाई खाली वाकून प्रेमाने शकुंतलाकडे पाहत होत्या; त्यांचा स्तन तिच्या तोंडात होता... ज्या आईने प्रेमासाठी शकुंतला वर्षानुवर्षं तळमळत होती ते तिला या क्षणी मिळालं होतं; सहस्रधारांनी मिळालं होतं. तिचा आत्मा तृप्त झाला होता.
There are no comments on this title.