कैलास-मानस - Kailas Manas
Material type:
- 9788177866162
- MHT-163
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | MHT-163 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-001054 |
प्रवासवर्णन
कैलास पर्वत हे सृष्टीचे बीज मानले जाते. तसेच ही संकल्पभूमी आहे.
इथे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. विष्णू व शंकर यांचे संकल्प म्हणजे ब्रह्मदेवाचे सृजनत्व, अशी हिंदूंची श्रद्धा आहे.
कैलास हे शंकर आणि पार्वतीचे हिमालयातील निवासस्थान; तर मानस सरोवर हे निसर्गाने निर्माण केलेले अद्भुत स्वप्न आहे. ब्रह्मदेवाने मनाने ह्या सरोवराची निर्मिती केली.
गौतम बुद्धांनी ह्याच सरोवराच्या मध्यभागी बसून जगाला ज्ञान दिले. महानुभाव पंथीय त्यांचा हंस अवतार मानसमध्ये झाला, असे मानतात, तर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेवाचे महानिर्वाण कैलासाहून झाले.
तिबेटमधील बोनपा धर्मीयांचेही हे पवित्र ठिकाण आहे.
वेद, उपनिषदे, स्कंदपुराण, महाभारत आणि मेघदूत या ग्रंथात कैलास-मानसचा उल्लेख आहे.
मराठी संतांचे मेरुमणी संत नामदेवांनी तेराव्या शतकात हिमालय ओलांडून कैलास-मानसची यात्रा केली. तसा त्यांचा अभंग आहे.
कैलास-मानस हे श्रीकृष्ण, दत्तात्रय, जैन तीर्थंकर आणि आदिशक्ती महालक्ष्मीची भूमी आहे.
असे हे हिमालयातील अद्भुत कैलास मानस श्रद्धाळू आणि साहसी पर्यटकास सतत खुणावत असते. उत्तर हिमालयातील निसर्गचक्राची बदलती सुंदर रूपे, अद्भुत सौंदर्याचा अनुभव आणि मानस काठची निळ्याभोर आकाशाखालची चिरशांतता अनुभवणे हे या प्रवासाचे वेगळेपण आहे.
There are no comments on this title.