रिपोर्टिंग पाकिस्तान - Reporting Pakistan
Material type:
- 9788195986163
- CH-218
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | CH-218 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000777 |
Browsing Dina Bama Patil Library & Study Room shelves, Collection: ISSUE-RETURN Close shelf browser (Hides shelf browser)
अनुभवकथन
'सौजन्याच्या बुरख्याआडून गंभीर कट-कारस्थान, हेरगिरी आणि दहशतवादी कृत्यं सुरूच असली, तरी इथं सांगितल्या गेलेल्या कहाण्या जीवनावर केंद्रित झालेल्या आहेत...' मे २०१४मध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी देशाबाहेर काढेपर्यंत मीना मेनन या 'द हिंदू'च्या इस्लामाबादमधल्या वार्ताहर होत्या. त्यांच्या अल्पकाळच्या वास्तव्यादरम्यान हालचालींवर बंधनं असतानाही मेनन यांनी इस्लामाबादमधल्या काही भागांमधलं जीवन आणि त्या अनुषंगानं येणारे विविध विषय यावर सविस्तरपणे लिहिलं. छळ सहन केलेल्या अहमदी समुदायाच्या लोकांशी त्या बोलल्या. त्यांनी निषेध सभांचं, मोर्चाचं वार्तांकन केलं, बॉम्बहल्ल्यात सर्वस्व हरवलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. फाळणीचा काळ अनुभवलेल्या लोकांशी संवाद साधला, राजधानीच्या परिघावरील, विस्ताराने मोठ्या आणि गजबजलेल्या अफगाण निर्वासितांच्या छावणीला भेट दिली. मरी ब्रुअरीबद्दल लिहिलं आणि राजकीय घडामोडीचं वर्णन केलं. यात जनरल मुशर्रफ यांच्यावर दाखल झालेल्या देशद्रोहाच्या खटल्याचाही समावेश आहे. पाकिस्तानातून वार्तांकन करणं आणि बातम्या पुरवणं ही पत्रकारितेतील एक अवघड आणि उत्कंठावर्धक कामगिरी मानली जाते, विशेषत: एका भारतीयासाठी. एका संघर्षरत समाजाचं अतिशय शोधक आणि मर्मभेदक रेखाटन मेनन यांनी केलं आहे. ते एकाच वेळी सूक्ष्म छटा दर्शवणारं आणि विविध विषयांना स्पर्श करणारं आहे. ते केवळ राजकारणाकडे बघत नाही, तर त्याखाली दडलेल्या मानवी वास्तविकतांचं दर्शन घडवतं.
There are no comments on this title.