नापास मुलांची गोष्ट - Napas Mulanchi Gosht
Material type:
- CH-184
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | CH-184 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000743 |
मुलाला परिक्षेत कमी गुण मिळाले तर आई वडिल निराश होतात. मुलं आत्महत्या करतात. अनेकांचे मानसिक संतुलन बिघडते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आईनस्टाईन, जे. कृष्णमूर्ती, विस्टन चर्चिल, लोकमान्य टिळक, अगस्त्यु रोखेँ, रामानुजन, इंदिरा गांधी, राज कपूर, यशवंतराव चव्हाण, कुसुमाग्रज, दया पवार, ना. सी. फडके, आर. के. नारायण, सी. रामचंद्र, शांता शेळके, आर. के. लक्ष्मण, गुलजार, सुशीलकुमार शिंदे, चंद्रशेखर धर्माधिकारी, जयंत साळगावकर, नरेंद्र जाधव, यशवंतराव गडाख, लक्ष्मण माने, वाय. सी. पवार, ही काही तत्त्वज्ञ, राजकारणी, चित्रकार, कलावंत, लेखक माणसे गणितात, इंग्लिशमध्ये, चित्रकलेत, भाषा विषयात नापास झालेली आहेत. आपल्या शालेय जीवनात, कॉलेजमध्ये निराशेचे ढग त्यांनी अनुभवले आहेत. पण ही माणसे निराश झालेली नाहीत. नापास झाल्यावर त्यांचे आयुष्य थांबले नाही. त्यांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला. समाजाला आनंद दिला. या मोठ्या माणसांचे बालपण, भावविश्व, मनातील उलघाल मनाला अस्वस्थ करते. त्यांनी पुढच्या आयुष्यात मिळवलेले मोठेपण आपल्याला भारावून टाकते. अशा नापास झालेल्या मोठ्या माणसांच्या गोष्टी तुमच्या मनात रुजून बसतील. कुठल्याही क्षेत्रात कधी तुम्हाला अपयश आले तर या मोठ्या माणसांचे चेहरे तुम्हाला आठवतील, तुमचे उद्याचे भविष्य घडविण्यासाठी.
There are no comments on this title.