आम्ही पाहिलेले शरद पवार - Amhi Pahilele Sharad Pawar
Material type:
- CH-93
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | CH-93 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000573 |
दिल्लीत मोर्च्यासाठी आलेल्या स्त्रियांची बस हरवल्याची बातमी पवारांना सकाळीच समजली. सारे कार्यक्रम रद्द करून पावणेसात वाजता पवारांनी थेट दिल्लीतले निजामुद्दीन पोलीस स्टेशन गाठले होते. तिथून दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना फोन करून त्यांनी आसपासच्या राज्यात सर्व बसेस तपासायला लावल्या होत्या. या बायकांची बस हरिद्वारला ट्रेस झाली. मी हरिद्वारच्या पोलीस अधिक्षकाकडून खातरजमा करून घेतली. बायकाच ती बस घेऊन दिल्लीहून हरिद्वारला गेल्या. "आता मी मुंबईला जातोय.'
पवारांनी सांगून टाकले. मी पवारांचे आभार मानले पण लगेच पुढचे वाक्य आले,
"या प्रकाराची बातमी देऊ नकोस."
मी लगेच म्हटले, "ही छान बातमी होईल."
त्यावर उत्तर आले,
"ही चौकटीतली बातमी होईल पण ती आली की,
या बायकांना त्यांचे नवरे कधीच मोर्च्याला पाठवणार नाहीत. बातमीपेक्षा ते महत्त्वाचे आहे. "
There are no comments on this title.