Backu 

अभोगी - Abhogi (Record no. 572)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 05575nam a2200157Ia 4500
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
ISBN 9788177663419
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number KD-19
100 ## - MAIN ENTRY--AUTHOR NAME
Author Name देसाई, रणजित
245 #0 - TITLE STATEMENT
Title अभोगी - Abhogi
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Place of publication पुणे
Name of publisher मेहता पब्लिशिंग हाऊस
Year of publication 2017
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Number of Pages 202 p.; PB
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc अभोगी'चा अभ्यास करताना कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती, भाषाशैली यापेक्षा प्रामुख्याने रचनापद्धतीचा विचार प्रकर्षाने करावा लागतो. कारण रणजित देसाईंच्या इतर कादंबर्‍यांच्या तुलनेत या कादंबरीची रचना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. फ्लॅशबॅक पद्धतीने कथानक उलगडत जाण्याचे तंत्र लेखकाने अवलंबले आहे. "नियतीने लादलेल्या, काहीवेळा स्वेच्छेने स्वीकारलेल्या जीवनातल्या अपूर्णतेचा डोळस स्वीकार आणि कलेपेक्षा माणुसकी श्रेष्ठ ठरवणारा मूल्यविचार हे या कादंबरीचे प्रमुख सूत्र आहे" अशा नेमक्या आणि समर्पक शब्दात दीपक घारे यांनी व्यक्त केलेला अभिप्राय 'अभोगी' चे नेमके स्वरूप स्पष्ट करणारा आहे.<br/>महेश आणि कैलास या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून लेखक स्वजीवनातील घटना, आवडीनिवडी, मृत्यूविषयीचे चिंतन, कलावंत म्हणून वाट्याला आलेले अनुभव याविषयीचा तपशील मोठ्या कौशल्याने मांडताना दिसतो. प्रकृती स्वास्थ्यासाठी घटप्रभेला काही काळ राहणे, मंगेशीवरील श्रद्धा, संगीताविषयीची आवड, गायकांवरील निष्ठा व जवळीक, कलेसाठी त्याग करण्याची वृत्ती, उतरत्या वयातील एकाकीपणाचे शल्य, जीवनातील जोडीदारांविषयीचे संमिश्र अनुभव इत्यादी बाबतीतील साम्य सहज लक्षात येण्याजोगे आहे. "दादांच्या एकाकी जीवनाचं प्रतिबिंब डॉ. कैलासमध्ये सरळ सरळ दिसतं", या आनंद यादवांच्या विधानातूनही याला पुष्टी मिळते.<br/>'अभोगी' हे या कादंबरीचे शीर्षक अर्थपूर्ण व सूचक आहे. किंबहुना आशयानुरूप सार्थ शीर्षक ही या कांदबरीची एक जमेची बाजू आहे. कादंबरीच्या शेवटी महेश कैलासला 'अभोगी' ऐकवतो. त्यात मनमुराद जागा घेतो. तेव्हा कैलास त्याविषयी समाधान व्यक्त करतो. महेशला सूर सापडल्याबद्दल त्याचा ऊर भरून येतो. "सप्तसुरांतून गाणं कधीच उपजत नसतं. ते मनातून उपजावं लागतं. त्या कल्पनेनं मी अस्वस्थ होत असे. मी अनेक प्रकारची भजनं ऐकली. अनेक तालसुरांचे ढंग पाहिले आणि अचानक मला माझा सूर गवसला. मी जाताना तुम्हाला वचन दिलं होतं. त्याचमुळं तुमच्यासमोरा अभोगी गायलो." (पृ.२३६) अशा शब्दात महेश 'अभोगी' ची सार्थकता स्पष्ट करतो. शोकात्म भाव, प्रेमातील विव्हलता, तळमळ, अंत:करणातील भावपूर्णतेचे प्रकटीकरण होण्यासाठी 'अभोगी' हा राग उपयुक्त मानला जातो. या कसोट्यांवर प्रस्तुत कादंबरीची सरसता आणि सकसता लक्षात घेणे संयुक्तिक वाटते.
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Subject कादंबरी
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Koha item type Books
Holdings
Write Off Books Lost status Collection Type Home library Current library Date of Accessioning Price Full call number Accession Number Department_2 Koha item type Department
    ISSUE-RETURN Dina Bama Patil Library & Study Room Dina Bama Patil Library & Study Room 25/06/2023 220.00 KD-19 DBPL-000080 Library Books Library
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No