Backu 

गावपांढरीच्या वाटेवर - Gavapandharicha Vatevara

खोत, आप्पासाहेब

गावपांढरीच्या वाटेवर - Gavapandharicha Vatevara - पहिली - कोल्हापूर अजब पब्लिकेशन 2010 - 136 p.; PB Paperback

'गावपांढरीच्या वाटेवर' या ग्रामीण कादंबरीत चवथ्या ग्रामीण पिढीची स्थित्यंतरे चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासारखा संवेदनशील माणूस जेव्हा खेड्यातील आजची सामाजिक परिस्थिती पाहतो तेव्हा मला गलबलून येतं. माझ्या गावपांढरीत स्वातंत्र्यानंतर स्वार्थी आणि उलट्या काळजाची माणसं कशी निर्माण झाली; याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला माणसांच्या मनात निद्रीस्त असलेला पशू जागा झाल्याचा दिसतो. त्या पशूनं केलेलं सामाजिक अधःपतन माझ्या काळजाला झोंबतं आणि मग माझे शब्द आकार घेतात. 'गावपांढरीच्या वाटेवर' ही कादंबरी जन्म घेते.
गावपांढरीत आता जुनं काही राहिलं नाही. मोटा जाऊन विजेचे पंप आले, बैलगाड्या कमी झाल्या. जीप, ट्रॅक्स, ट्रॅक्टर वाढले. सायकली जाऊन मोटार सायकली आल्या. दिवा, कंदील जाऊन विजेचा दिवा आला. घरोदारी रेडिओ, टी व्ही येऊ लागला. गावोगावी एस.टी., सिटी बसची सोय झाली. एस्.टी.डी. बुथ झाले, दूध गोळा करणारा गवळी जाऊन सहकारी दूध संस्था आल्या. सावकारकी जाऊन सेवा सोसायटी, पतसंस्था, बँका आल्या. कच्चे


कादंबरी

KD-115
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No