Backu 

पक्ष्यांचे लक्ष थवे - Pakshyanche Laksha Thave

महानोर, ना. धों.

पक्ष्यांचे लक्ष थवे - Pakshyanche Laksha Thave - तिसरी - मुंबई पॉप्युलर प्रकाशन 2024 - 98 p.; PB Paperback

ना. धों. महानोर,
मूलभूत गोष्टींवर नजर,
मराठी साहित्य,
रूपवादी साहित्याचा विरोध,
लघुनियतकालिकांची चळवळ,
लोकसाहित्याची परंपरा,
प्रगल्भ व्यक्तिमत्त्व,
मानवी संबंध,
निसर्ग आणि मानवाचा संबंध,
मानवी संस्कृती,
कवितेचा आत्मा,
संवेदनशीलता,
मानवी करुणा,
सहजसोपी आविष्कार पद्धती,
सहजसंवादी लयबद्ध कविता,
सुदृढ काव्यपरंपरा,
परंपरेचा विकास,
खोटी आधुनिकता,
संस्कृतीचा महत्त्वाचा भाग

ना. धों. महानोर यांचे व्यक्तिमत्त्व जगताना जीवनातल्या प्रत्येक अंगातील मूलभूत गोष्टींवर नजर ठेवून असते. मराठी साहित्याच्या क्षेत्रात प्रस्थापित व रूपवादी साहित्याच्या विरोधात जी लघुनियतकालिकांची चळवळ सुरू झाली तिच्याशीही ते संबंधित होते. लोकसाहित्याची परंपरा तर त्यांच्या परिसरात त्यांना रोजच जगताना अनुभवावयास मिळते. ह्या सर्व अनुभवांमुळे आणि मूलभूततेकडे कायम लक्ष ठेवण्याच्या प्रक्रियेमुळे महानोरांचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ, प्रसन्न आणि गंभीर झालेले आहे. मानवी संबंध व निसर्ग आणि मानव ह्यांचा संबंध मानवी संस्कृतीच्या दृष्टीने किती मूलभूत आहे ह्याची जाण ह्या व्यक्तिमत्त्वास आहे. ह्या दोन बाबींचा ध्यासच त्यांच्या कवितेचा आत्मा आहे. शिवाय संवेदनशीलतेमुळे आणि स्वीकारलेल्या जीवनपद्धतीमुळे येणारी प्रचंड दुःखे पचवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मानवी करुणेचा वावर आहे. जिथे मानवी आस्था आणि करुणा कार्यरत असते तिथे आविष्कार पद्धती आपोआपच सहज सोपी व इतरांशी संवाद साधू शकणारी होते त्यात पुन्हा महानोर तर लोकसाहित्याच्या भक्कम पायावर उभे आहेत. त्यांची कविता त्यामुळेच कधीही पवित्रे घेत नाही, कधीही विनाकारण अनाकलनीय आणि प्रतिमाळलेली होत नाही. ही सहजसंवादी लयबद्ध कविता एकाचवेळी आपल्या सुदृढ काव्यपरंपरेशी नाते जोडते, तिचा विकास करण्याचा प्रयत्न करते आणि खोट्या आधुनिकतेच्या नावाखाली बोकाळत चाललेल्या कवितेला आपल्या सुदृढ परंपरेची तीव्रपणे आठवण करून देते. सबब आम्हास ही कविता संस्कृतीच्या दृष्टीने अधिक मोलाची वाटते.

9788171853915


कविता संग्रह

KV-92
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No