माझा गाव - Maza Gaav
Material type:
- 8177660640
- KD-18
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KD-18 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000079 |
त्याकाळातील ग्रामीण भागात राहणारा माणूस कसा होता, कसा जगत होता, त्याचे परस्पर संबंध गाबाबद्दलची आत्मीयता कशी होती, संकटकाळी तो कसा वागत होता याचं प्रत्ययकारी दर्शन "माझा गाव’ मधून घडत.
हळूहळू जुन्या चांगल्या परंपरांचे समाजातून उच्चाटन होवू लागले आणि त्याजागी कोणत्याच उच्च मुल्यांची स्थापना न झाल्यामुळे समाजाच्या विविध घटकात बेबनाव वाढत गेला. स्वार्थीपणा आणि भाऊबंदकी यामुळे माणसातील माणुसकीचा लोप होवू लागला. म्हणूनच जुन्या परंपरांमधील चांगुलपणाचे, गुणगान करण्याची एक मनस्वी ओढ लेखकाला वाटत आली आहे. यातूनच "माझा गाव’ ची निर्मिती झाली आहे.
या कादंबरीतले प्रत्येक पात्र जीवंत आहे स्वाभविक वाटणारे आहे. खेड्यातील पाटील-कुलकर्णी एकत्र आल्यावर गावाच्या उद्धारासाठी, गोरगरीबांसाठी बरेच काही घडू शकते आणि पूर्वीच्या काळी ते घडतही होते याचा परिचय करून देणारी एक हृद्य कादंबरी. जुन्या पिढीतील परोपकारी व बुद्धीमान असे तात्या कुलकर्णी आणि गावावर जीवापाड प्रेम करणारे आप्पासाहेब इनामदार यांच्या परस्पर संबंधातून कादंबरीचे कथानक फुलत जाते. आजच्या संकुचित, स्वत:पुरते पाहणार्या मानसिकतेमुळे होणार्या सामाजिक र्हासाच्या पार्श्वभूमीवर आजही ह्या कादंबरीचे महत्त्व अधिक आहे.
There are no comments on this title.